जो बायडन यांचा शपथविधी सोहळा LIVE

जो बायडन यांचा शपथविधी सोहळा LIVE

जो बायडन यांचा शपथविधी जीएटी प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता तर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेदहा वाजता अमेरिकेची राजधानी वॉशिंटनमध्ये होईल. त्यांच्यासोबत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिला महिला आणि कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत.

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार लेडी गागा या प्रसंगी अमेरिकेचं राष्ट्रगीत गाणार आहेत. जेनिफर लोपेझ आणि गार्थ ब्रुक्सही सादरीकरण करणार आहेत.