संजय राऊत यांच्याविषयी दिल्ली-गाझीपूर सीमेवरच्या शेतकऱ्यांमध्ये एवढी क्रेझ का?

संजय राऊत यांच्याविषयी दिल्ली-गाझीपूर सीमेवरच्या शेतकऱ्यांमध्ये एवढी क्रेझ का?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (2 फेब्रुवारी) दिल्लीच्या गाझीपूर सीमेवरील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली.

यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे इतर खासदारसुद्धा उपस्थित होते. राऊत यांनी यावेळी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली.

"महाविकास आघाडीने शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. शेतकऱ्यांची तडफड व अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्ष प्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे,' असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं.

त्यानंतर ते शेतकरी आंदोलकांच्या भेटीसाठी दुपारी 1 वाजता दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर गेले होते. तेव्हा गाझीपूर येथे आलेल्या शेतकऱ्यांमध्ये संजय राऊत यांच्याविषयी एक वेगळीच क्रेझ दिसून आली.

व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)