नरेंद्र मोदी, राहुल गांधींसह नेत्यांना फेसबुक, ट्विटरपासून दूर का जाता येणार नाही

नरेंद्र मोदी, राहुल गांधींसह नेत्यांना फेसबुक, ट्विटरपासून दूर का जाता येणार नाही

सध्या मोदी सरकार आणि ट्विटर यांच्यात वाद सुरू आहे. देशाच्या राजकारणात ही टेक कंपनी हस्तक्षेप करतेय असा आरोप होतोय.

अमेरिकन पॉपसिंगर रिहानाच्या ट्वीटनंतर या वादाला तोंड फुटलं. पण या वादातून एक गोष्ट समोर आली आहे. दिल्लीपासून 12 हजार किलोमीटर दूर सॅन फ्रान्सिस्कोतून चालणारी ‘ट्विटर’ ही अमेरिकेतली टेक कंपनी आहे. ती आता भारताच्या राजकीय चर्चेचा मोठा प्लॅटफॉर्म बनलीये. तसं पाहायला गेलं तर राजकीय चर्चा ही भारतीय संसदेत, राज्यांच्या विधानसभा इथं व्हायला पाहिजे. सध्याचं किसान आंदोलन पाहता शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात चर्चा व्हायला पाहिजे. पण ती आता टेक कंपनी म्हणजे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर होताना दिसतेय. हे घडलं कसं? टेक कंपन्यांचं राजकारणातलं वर्चस्व वाढतंय का?

व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, बीबीसी मराठी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)