पूजा चव्हाण मृत्यूनंतर पूजाच्या वडिलांची भावनिक साद

पूजा चव्हाण मृत्यूनंतर पूजाच्या वडिलांची भावनिक साद

परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

महाविकास आघाडीतील एका मंत्र्यामुळे या तरुणीने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. त्यावरून राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे.

मात्र माध्यमांमध्ये अनेक उलटसुलट बातम्या येत असल्याचं सांगत उद्विग्न झालेले पूजाचे वडील लहू चव्हाण यांना तिच्या आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले.

“माझ्या मुलीला बदनाम करू नका,” असं लहू चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)