खोल समुद्रात बोटीवर अडकलेल्या रोहिंग्या निर्वासितांची सुटका कधी होणार?

खोल समुद्रात बोटीवर अडकलेल्या रोहिंग्या निर्वासितांची सुटका कधी होणार?

खोल समुद्रात बोटीवर अडकलेल्या जवळपास बारा रोहिंग्या निर्वासितांची लवकरात लवकर सुटका करावी असं आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केलंय. बोटीवर अडकलेल्यांपैकी आठ जणांचा आधीच मृत्यू झालाय अशी माहिती मिळतेय. गेल्या वर्षी बांगलादेशातील रोहिंग्या निर्वासितांच्या छावणीमधून समुद्रमार्गे पलायन करणाऱ्या जवळपास दोनशे जणांवर मृत्यू ओढवला होता. आता बोटीवर अडकलेल्या लोकांसाठी भारत सरकारने अन्न आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. पण संयुक्त राष्ट्रांनी म्हटलंय की या लोकांची सुटका केली नाही तर त्यांना जीव गमवावा लागेल. दक्षिण आशियाच्या बीबीसी प्रतिनिधी रजनी वैद्यनाथन यांचा रिपोर्ट पाहुया.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)