पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनावरची लस

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनावरची लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी कोरोना लस घेतली. दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ही लस घेतली.

पंतप्रधानांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतली. सिस्टर पी. निवेदा यांनी पंतप्रधानांना लस टोचली.

"आज मी एम्स हॉस्पिटलमध्ये कोव्हिड लशीचा पहिला डोस घेतला. आपल्या डॉक्टर तसंच शास्त्रज्ञांनी विक्रमी वेळेत कोरोनावर लस शोधून काढली आहे. आताच्या टप्प्यात जे लस घेण्यासाठी पात्र आहेत त्यांनी जरूर घ्यावी", असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.

ISWOTY

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)