असा फोनबॉक्स ज्याठिकाणी मृत लोकांना फोन लावला जातो?

असा फोनबॉक्स ज्याठिकाणी मृत लोकांना फोन लावला जातो?

10 वर्षांपूर्वी जपानला त्सुनामीचा मोठा तडाखा बसला होता. त्यामुळे उत्तर जपानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. जवळजवळ वीस हजार लोकांचा जीव गेला होता.

एकाकी त्यांच्या जवळची माणसं दिसेनाशी झाली. त्यामुळे त्यांना एकटं वाटू लागलं. पण त्या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी एक व्यक्तीने मार्ग काढला आहे.

कुठेही फोन न लागणारा आणि कधी त्यावर पलीकडून फोन न येणारा हा फोनबॉक्स आहे. जग सोडून जायच्या आधी शेवटची भेट झाली असती तर मृत नातेवाईकांना जे काही सांगायचं होतं ते याठिकाणी सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)