म्यानमार लष्करी उठाव : बौद्ध भिक्खूंचा पाठिंबा लष्कराला की जनतेला?

म्यानमार लष्करी उठाव : बौद्ध भिक्खूंचा पाठिंबा लष्कराला की जनतेला?

म्यानमारमधील परिस्थिती अद्याप चिघळलेली आहे. लष्कराने सत्ता हस्तगत केल्यावर तिथे पुन्हा लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी लोकांनी आंदोलन सुरू केलं आहे. पण नागरिकांचा मुकाबला आहे तो शस्त्रसज्ज अशा लष्कराशी. लष्कराने आंदोलन चिरडून टाकण्यासाठी बळाबरोबरच शस्त्रांचाही वापर केला आहे.

त्यामुळे आतापर्यंत पाचशेच्या वर सामान्य नागरिकांचा बळी गेला आहे. म्यानमारमध्ये बौद्ध भिक्खूंचा जनमानसावर मोठा प्रभाव आहे. आणि लोकांची राजकीय मतंही भिक्खूंमुळे प्रभावित होतात. अशावेळी आताच्या परिस्थितीबद्दल काही लोकप्रिय भिक्खूंची काय मतं आहेत हे बीबीसीने जाणून घेतलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)