प्रिन्स फिलीप यांचं निधन

प्रिन्स फिलीप यांचं निधन

राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं. बकिंगहॅम पॅलेसने ही घोषणा केली.

राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) आणि प्रिन्स फिलीप यांचं लग्न 1947 मध्ये झालं. त्यांना चार मुलं, आठ नातू आणि दहा पणतू आहेत.

बकिंगहॅम पॅलेसकडून आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. "अतीव दुःखाने हर मॅजेस्टी राणी एलिझाबेथ त्यांचे प्रिय पती हिज रॉयल हायनेस द प्रिन्स फिलीप, ड्यूक ऑफ इडिनबरा यांच्या निधनाची बातमी जाहीर करत आहेत. "हिज रॉयल हायनेस आज सकाळी विंडसर कॅसलमध्ये शांतपणे निवर्तले."

राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) आणि प्रिन्स फिलीप यांचं लग्न 1947 मध्ये झालं. त्यांना चार मुलं, आठ नातवंडं आणि दहा पतवंडं आहेत.