काबूल विमानतळ 2 स्फोट आणि गोळीबाराने हादरलं, तालिबानकडून निषेध

काबूल विमानतळ 2 स्फोट आणि गोळीबाराने हादरलं, तालिबानकडून निषेध

अफगाणिस्तानच्या काबूल विमानतळाच्या एका प्रवेशद्वारावर गुरुवारी (26 ऑगस्ट) दोन आत्मघातकी स्फोट झाले.

विमानतळावर असलेल्या अमेरिकन सैन्याच्या अधिकाऱ्याने रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, एका हल्लेखोराने गर्दीत घुसून पहिला स्फोट घडवून आणला. त्यानंतर दुसऱ्या हल्लेखोराने आधी गोळीबार केला आणि मग स्वत:ला उडवलं.

मरण पावलेल्यांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. आणि स्फोटाची तीव्रता तसंच तिथं असलेली गर्दी पाहता मृतांचा आकडा वाढू शकतो.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)