नंदुरबारमध्ये अँब्युलन्स न मिळाल्यानं झाला आदिवासी महिलेचा मृत्यू? ​

नंदुरबारमध्ये अँब्युलन्स न मिळाल्यानं झाला आदिवासी महिलेचा मृत्यू? ​

नंदुरबारमधील चांदसैली गावातील सुंगडीबाई पाडवी या 45 वर्षीय महिलेचा योग्य वेळी रुग्णालयात पोहोचू न शकल्याने मृत्यू झालाय.

सुंगडीबाई आजारी होत्या, मात्र गावात आरोग्य सुविधा नसल्याने त्यांच्या पतीनं त्यांना खांद्यावर घेऊन दीड-दोन किलोमीटर प्रवास करत त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. पण या खडतर प्रवासात त्यांनी पतीच्या खांद्यावरच आपले प्राण सोडले.

या घटनेमुळे पुन्हा एकदा सातपुड्यातील आरोग्य सुविधांच्या अभावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)