प्याँगयांगचा बादशाह

अंत्ययात्रा

28 डिसेंबर 2011.प्याँगयांगमध्ये भयंकर थंडी पडली होती. जोरदार हिम वर्षावातून वाट काढत एक मोठी काळी लिंकन काँटिनेंटल कार पुढे जात होती. कारच्या टपावर होती सफेद गुलमोहराच्या फुलांनी सजलेली एक शवपेटी. आणि त्या पेटीत होतं उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जाँग-इल यांचं पार्थिव.

काळे कपडे घातलेले लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. छाती बडवत, किम जाँग-इल यांना हाका मारत आक्रोश करणाऱ्या, धाय मोकलून रडणाऱ्या जनतेला आवरणं सैनिकांना कठीण जात होतं.

कारच्या शेजारून चालत होता या दिवंगत हुकुमशहाचा मुलगा आणि वारसदार किम जाँग-उन. अवघ्या 27 वर्षांचा हा तरूण हेलावून गेला होता. या संपूर्ण विधीच्या दरम्यान अनेकदा त्याला अश्रू अनावर झाले.
जाँग-उनच्या मागोमाग चालत होते त्याचे काका चँग साँग-थाएक. त्यांना उत्तर कोरियातलं दुसरं सर्वांत शक्तिशाली व्यक्तिमत्त्व मानलं जायचं. गाडीच्या दुसऱ्या बाजूला चालत होते लष्कर प्रमुख री याँग-हो आणि संरक्षण मंत्री किम याँग-चुन.
प्याँगयांगमधली सगळी सूत्रं आता या ज्येष्ठ व्यक्तींच्या हाती येणार होती. किंबहुना, त्यांच्या हाती येतील,असंच सर्वांना वाटत होतं.
1950च्या दशकात किम जाँग-उन यांचे आजोबा किम इल-संग यांनी कम्युनिस्ट जगतात वेगळी वाटणारी एक गोष्ट केली. त्यांनी वारसाहक्कानं पुढच्या पिढीकडे जाणारं एककेंद्री नेतृत्व उत्तर कोरियात निर्माण केलं.
पुढची दोन दशकं त्यांनी त्यांचा मोठा मुलगा किम जाँग-इल यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घडवलं. ते कुठेही गेले तरी हा भावी राजा त्यांच्या सोबत असायचा. 1994मध्ये जेव्हा या वृद्ध राजाचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या राजकुमार किम जाँग-इल यांनी ताबडतोब सूत्रं हाती घेतली.
पण 2011मध्ये त्यांचं आकस्मिक निधन झालं तेव्हा त्यांचा मुलगा उत्तर कोरियाचा तिसरा सर्वेसर्वा होण्यासाठी जेमतेम तयारीला लागला होता. आता ही एकाधिकारशाही कोसळणार, असा अंदाज अनेक तज्ज्ञ वर्तवत होते. पण हे सगळे लवकरच चुकीचे ठरणार होते.
काही महिन्यांतच लष्कर प्रमुख री याँग-हो आणि संरक्षण मंत्री किम याँग-चुन या दोघांनाही बडतर्फ करण्यात आलं. री यांचं नेमकं पुढे काय झालं, हे तर आजही गूढ आहे.

त्यानंतर डिसेंबर 2013 मध्ये किम जाँग-उन यांनी त्यांचा सर्वांत नाट्यमय निर्णय घेतला. त्यांचे काका, चँग साँग-थाएक यांना पक्षाच्या बैठकीतून फरफटत नेण्यात आलं आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली मृत्युदंड देण्यात आला. काही बातम्यांनुसार यासाठी त्यांनी अँटी-एअरक्राफ्ट गन म्हणजेच विमान पाडण्यासाठी वापरण्यात येणारी बंदूक वापरल्या, पण हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

2012 ते 2016 दरम्यान किम यांनी त्यांच्या आजोबांच्या कार्यकाळापासून आतापर्यंतची सर्वांत मोठी साफसफाई मोहीम हाती घेतली. दक्षिण कोरियाच्या Institute for National Security Strategy नुसार तब्बल 140 बड्या मृत्युदंड देण्यात आला. इतर 200 जणांना काढून टाकण्यात आलं किंवा तुरुंगात टाकण्यात आलं.

आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला किम यांनी दूर केलं आणि त्या जागी त्यांच्या विश्वासातल्या आणि वयानं तरुण व्यक्तीला नेमलं. याचं उदाहरण म्हणजे किम यांची बहीण किम यो-जुंग. वयाच्या 30व्या वर्षी त्यांची नेमणूक पॉलिट ब्युरोच्या प्रमुखपदी करण्यात आली.
आज प्याँगयांगमधली सगळी सूत्रं कोणाच्या हाती आहेत, याबाबत कुणालाच शंका नाही. किम जाँग-उन आता सर्वेसर्वा आहेत.

डिसेंबर 2011 मध्ये किम जाँग-इल यांच्या अंत्ययात्रेत काका चँग साँग-थाएक यांच्याबरोबर किम जाँग-उन.
दोन वर्षांनी चँग यांना मृत्युदंड देण्यात आला.

ब्रिजवरचं चहापान

एप्रिल 2018 मधली एक उबदार दुपार. प्याँगयांगमधला तो कडाक्याच्या थंडीचा दिवस उलटून सहा वर्षं झाली आहेत.
उत्तर आणि दक्षिण कोरियाला एक डिमिलिटराईज्ड झोन (DMZ), म्हणजेच शस्त्रास्त्रांवर बंदी असलेलं क्षेत्र विभागतं. या क्षेत्राच्या मध्यात, जंगलातल्या एका मोकळ्या जागेत असलेल्या लाकडी पुलावर किम जाँग-उन बसले आहेत. इथे चहाचे घोट घेत किम दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत आहेत.
या बैठकीचं थेट प्रक्षेपण जगभरात केलं जातंय. पण ही बैठक पाहणाऱ्या कुणालाच त्यांचं बोलणं मात्र ऐकता येत नाहीये.

पुढचा अर्धा तास जगभरात अनेकांच्या नजरा या मूक संवादावर खिळलेल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीचा, हावभावांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जातोय.

अगदी काही महिन्यांपूर्वीच किम यांनी जपानवरून जातील अशा क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती, तसंच सोल आणि अमेरिकेवर आग ओकण्याची धमकी दिली होती..

आणि आता ते त्याच शत्रूबरोबर बसून, हसत गहन चर्चा करत आहेत.

स्वतःच्या काकालाच ठार मारणारा माणूस ते या फोटोतला माणूस, याची संगती कशी लावायची?

असेच कित्येक प्रश्नं आहेत. किम यांना नक्की काय हवंय? त्यांची ही वागणूक सगळी खोटी, आभासी आहे ना? की किम जाँग-उन यांनी खरंच आजोबा किम इल-संग यांनी पाया घातलेल्या आणि वडील किम जाँग-इल यांनी दाखवलेल्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग अवलंबायचं आता ठरवलं होतं?

लिटि जनरल

साल 1992. प्याँगयांगमधल्याएका बंगल्यात आठ वर्षांच्या एका मुलाची खास बर्थडे पार्टी सुरू आहे. या मुलाला मिळालेल्या गिफ्ट्सपैकी एक गिफ्ट विशेष आहे.

तो आहे जनरलचा युनिफॉर्म. खेळातला नाही तर खराखुरा. कोरियन पीपल्स आर्मीच्या जनरलच्या युनिफॉर्मसारखाच तंतोतंत. आणि पूर्णतः अस्सल, फक्त आकाराने लहान.

आजूबाजूचे लोक त्याला असं वागवत असताना त्याने सर्वसामान्यांसारखं मोठं होणं अशक्य होतं”

को याँग-सुक

त्याच्यापेक्षा वयानं कितीतरी मोठे असणारे इतर जनरल पार्टीला येत आहेत आणि आल्यावर त्या आठ वर्षांच्या मुलासमोर झुकत आहेत. त्या मुलाचं नाव होतं किम जाँग-उन.

हा आठ वर्षांचा लहानगा ‘जनरल किम’ कसा झाला, याची आठवण किम यांची आत्या 2016 साली वॉशिंग्टन पोस्टने छापलेल्या मुलाखतीत आहे. दोन दशकांपूर्वी को याँग-सुक आणि त्यांचा नवरा पश्चिमेकडच्या देशांत पळून गेले होते. आता ते न्यूयॉर्कच्या बाहेर एका निवांत जागी राहतात.

वडील किम जाँग-इलचा वारसदार म्हणून किम जाँग-उनचीच नियुक्ती केली जाईल, याची खात्री आपल्याला या आठव्या वाढदिवसालाच पटल्याचं को यांनी या मुलाखतीत सांगतात.

“आजूबाजूचेलोक त्याला असंवागवत असताना त्याने सर्वसामान्यांसारखं मोठं होणं अशक्य होतं,” को म्हणतात.

काही वर्षांनंतर किम जाँग-उन यांना स्वित्झर्लंडच्या एका खासगी शाळेत पाठवण्यात आलं, तेव्हा त्यांच्यासोबत जाण्याची जबाबदारी को याँग-सुक यांच्यावर सोपवण्यात आली.

टीनएजर किम खूप तापट आणि उद्धट होता, त्या सांगतात.

“तो खोडकर नव्हता. पण त्याला पटकन राग यायचा आणि त्याच्यात अजिबात सहनशीलता नव्हती. नुसतं खेळत बसणं, बिल्कुल अभ्यास नाही करणं, यासारख्या गोष्टींसाठी जेव्हा त्याची आई त्याला रागवायची, तेव्हा तो उलट उत्तर द्यायचा नाही, पण तो उपोषण करायचा, निषेध व्यक्त करायचा.”

किम जाँग-उन यांच्या बालपणाविषयी एवढीच काय ती माहिती उपलब्ध आहे. ते नेमके कसे आहेत, आणि त्याचे मोठे भाऊ किम जाँग-चॉल आणि सावत्र भाऊ किम जाँग-नाम यांना डावलून वारसदार म्हणून त्यांची निवड का करण्यात आली, याचा अंदाज बांधण्यासाठी ही माहिती पुरेशी नाही.

केंजी फुजीमोटो या टोपणनावानं ओळखले जाणारे जपानी सुशी शेफ यांनी किम जाँग-उन सत्तेवर येण्याचा अंदाज कदाचित पहिल्यांदा वर्तवला होता.

1990च्या दशकात फुजिमोटो अनपेक्षितरीत्या किम यांच्या जवळच्या लोकांपैकी एक झाले. किम जाँग-इलसाठी ते जपानी जेवण तयार करायचे,आणि लहान किम जाँग-उनचा “खेळगडी” असल्याचा दावा ते करतात.

2001मध्ये फुजिमोटो जपानला परतले आणि त्यांनी त्यांची कहाणी छापली. किम जाँग-उन आणि त्यांचा मोठा भाऊ किम जाँग-चॉल यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचं वर्णन त्यांनी यात केलं आहे.

“मी पहिल्यांदा या दोन तरुण राजकुमारांना भेटलो तेव्हा त्या दोघांनीही लष्करी गणवेश घातला होता. त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी हात मिळवले. पण जेव्हा माझ्याशी हस्तांदोलन करण्याची वेळ आली, तेव्हा राजकुमार किम जाँग-उनने माझ्याकडे थंड नजरेने पाहिलं, जणू काही तो मला सांगत होता, ‘तुझ्यासारख्या जपानी लोकांचा आम्ही तिरस्कार करतो’. त्याची ती तीक्ष्ण नजर मी कधीच विसरणार नाही. तो तेव्हा सात वर्षांचा होता.”

2003 मध्ये आपल्या दुसऱ्या पुस्तकात फुजिमोटो यांनी लिहिलं:
“किम जाँग-चॉल यांना वारसदार मानलं जातंय, पण मला याबाबत शंका वाटते. किम जाँग-इल म्हणायचे, ‘हा जाँग-चॉल काही कामाचा नाही, तो अगदी मुलीसारखा आहे’. त्यांचा सर्वांत लहान मुलगा, दुसरा राजकुमार त्यांचा जास्त लाडका आहे. जाँग-उन हा खूप त्याच्या वडिलांसारखा आहे. त्याची शरीरयष्टीही अगदी वडिलांसारखी आहे. पण त्याच्याविषयी लोकांना फारसं काही माहीत नाही.”

ही भविष्यवाणी उल्लेखनीय होती. तेव्हा किम जाँग-उन यांची ओळख उत्तर कोरियाच्या नागरिकांशीही करून देण्यात आली नव्हती. जगाला त्यांच्याविषयी समजणं दूरची गोष्ट होती. त्यांचं बालपण हे अजूनही एक मोठं रहस्य होतं.

घराण्यातल्या लढाया

चॉय मिन-जुन 14 वर्षांचा असताना त्याची निवड उत्तर कोरियातल्या अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सुप्रीम गार्ड कमांड दलामध्ये करण्यात आली. आज तो देश सोडून दक्षिण कोरियात वेगळ्या नावाने राहत आहे.

उत्तर कोरियाच्या राजघराण्याचं संरक्षण करणाऱ्या या अतिशय गुप्त पथकाची झलक नुकतीच पहायला मिळाली. एप्रिलमध्ये दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांच्याबरोबरच्या बैठकीसाठी किम जाँग-उन DMZ मध्ये दाखल होत असताना त्यांच्या मर्सिडीझ लिमोझीनच्या दोन्ही बाजूंनी सूट-बूट घातलेले, उंच अंगरक्षक धावताना दिसले. सुप्रीम गार्ड कमांडच्या सर्वांत आतल्या वर्तुळातले हे सर्वोत्तम अधिकारी होते.

चॉय मिन-जुनला या सर्वांत महत्त्वाच्या वर्तुळात शिरता येणं शक्यच नव्हतं. एक कारण म्हणजे तो तितका उंच नव्हता. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी चुकीची होती.

“माझा जन्म समाजातल्या उच्च वर्गात झाला नव्हता,” चॉयने मला सांगितलं, “म्हणून मला सर्वोच्च नेत्याचा खासगी अंगरक्षक म्हणून काम करता आलं नाही. त्याऐवजी माझी नेमणूक त्याच्या लढाऊ दलात करण्यात आली.”

आपण एक समाजवादी सत्ता असल्याचा कितीही मोठा दावा उत्तर कोरियानं केला तरी, तिथं एक तपशीलवार आणि कडक जातीव्यवस्था आहे. साँगबन नावाच्या या व्यवस्थेनुसार प्रत्येक व्यक्तीची तिच्या जन्मापासून वर्गवारी केली जाते. NKNews या वेबसाईटनं साँगबनचं असं वर्णन केलं आहे :

“हीव्यवस्था लोकसंख्येची विभागणी काही गटांमध्ये करते. जपानी राजवट असताना आणि कोरियन युद्धादरम्यान एखाद्या व्यक्तीच्या वडिलांचं, तिच्यापूर्वजांचंकाय वर्तन होतं, त्यांचा काय हुद्दा होता, यानुसार ही विभागणी केली जाते. एखाद्याव्यक्तीनंराजधानीत रहावं का, त्यालाकोणत्या ठिकाणी काम करता यावं आणि कोणत्या प्रकारचं शिक्षण मिळावं,हे सगळं साँगबनद्वारेठरवण्यात येतं.”
सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे साँगबनद्वारे देण्यात आलेला दर्जा कधीच बदलता येत नाही. कोरियावर जपानची सत्ता असताना जर तुमच्या वडिलांनी किंवाआजोबांनी त्यांच्याविरोधात लढा दिला असेल, तर तुम्हाला “इमानदार” मानलं जातं. पण जर त्यांनी जपानी राजवटीसाठी काम केलं असेल तर तुम्ही “शत्रू” आहात आणि कायम शत्रूच राहाल.

“उत्तर कोरियाचं लष्कर, जनरल स्टाफ डिपार्टमेंट, संरक्षण मंत्रालय आणि अगदी उत्तर कोरियातले सगळे लोक, हे सगळेच त्यांचे संभाव्य शत्रू आहेत.”

चॉय गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला. त्यांच्या पूर्वजांनी जपान्यांसाठी काम नव्हतं केलं, पण त्यांनी जपान्यांना विरोधही केला नव्हता. म्हणून चॉयची रवानगी लढाऊ पथकात करण्यात आली. तो किती इमानदार आहे, हे सांगण्यासाठी त्याचं हे “स्टेटस” काही कामी आलं नाही.

“उत्तर कोरियामध्ये लहानपणापासूनच तुमच्या मनावर काही गोष्टी बिंबवल्या जातात,” तो म्हणतो. “किम घराणं हे देवासमान असल्याचं मला शिकवण्यात आलं होतं, आणि मी त्यावर विश्वास ठेवला.”

“ज्यावेळी किम इल-संग यांनी नववर्षाचं भाषण दिलं आणि त्यामध्ये यावर्षी खाणीतून जास्त कोळसा काढण्याबाबत म्हटलं तेव्हा मी म्हणालो, ‘मी जाईन खाणीमध्ये!’ मी इतका भोळा होतो, किम घराण्याशी एकनिष्ठ होतो.”

पण लवकरच चॉयच्या लक्षात आलं की सुप्रीमगार्ड कमांड ही किम यांना परदेशी शत्रूंपासून नाही तर त्यांच्या स्वतःच्याच लोकांपासून संरक्षण देत आहे.

“किम घराण्यासाठी प्रत्येक जण हा संभाव्य शत्रू आहे,” त्यानं मला सांगितलं. “उत्तर कोरियाचं लष्कर, जनरल स्टाफ डिपार्टमेंट, संरक्षण मंत्रालय आणि अगदी उत्तर कोरियातले सगळे लोक, हे सगळेच त्यांचे संभाव्य शत्रू आहेत.”

कोणावरही, अगदी स्वतःच्या पालकांवरही विश्वास न ठेवण्याचं प्रशिक्षण चॉयला देण्यात आलं होतं.

किम कुटुंबीयांची ही भीती जसजशी वाढत गेली, तसतशी त्यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांची फौजही वाढत गेली.

“ईस्टर्नब्लॉक (पूर्व युरोपातलेकम्युनिस्ट देश) आणि सोव्हिएत युनियनची पडझड झाली आणि किमघराण्यात धडकी भरली. त्यांनी तातडीने सुप्रीम गार्ड कमांडची संख्या वाढवलीआणि आज जवळपास एक लाख वीस हजार सैनिक राज घराण्याचं रक्षण करतात,” त्यानं सांगितलं.

एखाद्या मध्ययुगीन राजघराण्याप्रमाणेच किम राजवटीला आपल्या सत्तेविषयीची असुरक्षितता आहे. म्हणून त्यांना सगळीकडे शत्रू दिसतात.
आणि वेगवेगळ्या काळातल्या इतर राजघराण्यांप्रमाणेच हे घराणंही अनेकदा स्वतःला सुरक्षित करण्यासाठी लोकांचा जीव घेतं.

चॉय गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला. त्यांच्या पूर्वजांनी जपान्यांसाठी काम नव्हतं केलं, पण त्यांनी जपान्यांना विरोधही केला नव्हता. म्हणून चॉयची रवानगी लढाऊ पथकात करण्यात आली. तो किती इमानदार आहे, हे सांगण्यासाठी त्याचं हे “स्टेटस” काही कामी आलं नाही.

“उत्तर कोरियामध्ये लहानपणापासूनच तुमच्या मनावर काही गोष्टी बिंबवल्या जातात,” तो म्हणतो. “किम घराणं हे देवासमान असल्याचं मला शिकवण्यात आलं होतं, आणि मी त्यावर विश्वास ठेवला.”

“ज्यावेळी किमइल-संगयांनी नववर्षाचंभाषण दिलं आणि त्यामध्ये यावर्षी खाणीतून जास्त कोळसा काढण्याबाबत म्हटलं तेव्हा मी म्हणालो, ‘मी जाईन खाणीमध्ये!’ मीइतका भोळा होतो, किम घराण्याशी एकनिष्ठ होतो.”
पण लवकरच चॉयच्या लक्षात आलं की सुप्रीमगार्ड कमांड ही किम यांना परदेशी शत्रूंपासून नाही तर त्यांच्या स्वतःच्याच लोकांपासून संरक्षण देत आहे.
प्रत्येक जण हा संभाव्य शत्रू आहे,” त्यानं मला सांगितलं. “उत्तरकोरियाचं लष्कर, जनरल स्टाफ डिपार्टमेंट, संरक्षण मंत्रालय आणि अगदी उत्तर कोरियातले सगळे लोक, हे सगळेच त्यांचे संभाव्य शत्रू आहेत.”

कोणावरही, अगदी स्वतःच्या पालकांवरही विश्वास न ठेवण्याचं प्रशिक्षण चॉयला देण्यात आलं होतं.
किम कुटुंबीयांची ही भीती जसजशी वाढत गेली, तसतशी त्यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांची फौजही वाढत गेली.

“ईस्टर्नब्लॉक (पूर्व युरोपातलेकम्युनिस्ट देश) आणि सोव्हिएत युनियनची पडझड झाली आणि किमघराण्यात धडकी भरली.त्यांनी तातडीने सुप्रीम गार्ड कमांडची संख्या वाढवलीआणि आज जवळपासएक लाख वीस हजार सैनिक राजघराण्याचं रक्षणकरतात,” त्यानं सांगितलं.
एखाद्या मध्ययुगीन राजघराण्याप्रमाणेच किम राजवटीला आपल्या सत्तेविषयीची असुरक्षितता आहे. म्हणून त्यांना सगळीकडे शत्रू दिसतात.
आणि वेगवेगळ्या काळातल्या इतर राजघराण्यांप्रमाणेच हे घराणंही अनेकदा स्वतःला सुरक्षित करण्यासाठी लोकांचा जीव घेतं.

किमचा भाऊ

12 फेब्रुवारी 2017. मलेशियाची राजधानी क्वालालंपूरच्या एका रेस्टॉरंटमध्ये काही मित्र जमले होते. सीती आयस्याह या इंडोनेशियन महिलेचा 25वा वाढदिवस ते साजरा करत होते. तिच्या मित्रमंडळींपैकी एकाच्या फोनमधील व्हिडिओमध्ये ती हसताना, केकवरच्या मेणबत्त्या विझवताना आणि गाताना दिसत होती.

त्या रात्रीचं जे वर्णन आयस्याहनं केलं आहे त्यानुसार, आपल्याकडे एक आनंदाची बातमी असल्याचं तिनं तिच्या मित्रमैत्रिणींना सांगितलं. तिला टीव्हीवरच्या एका रिएलिटी शोमध्ये काम मिळालं होतं. आता तिला क्वालालंपूरमधल्या बदनाम सार्वजनिक स्नानगृहातली नोकरी सोडून दूर जाता येणार होतं. तिच्या मित्रमैत्रिणींनी तिच्यासाठी ड्रिंक टोस्ट केलं, “आता तू स्टार होणार!"

दुसऱ्या दिवशी सकाळी सीती आयस्याहने क्वालालंपूर विमानतळावर आपलं लक्ष्य हेरलं. निळा टी शर्ट आणि स्पोर्ट्स जॅकेट घातलेला गलेलठ्ठ, टक्कल पडलेला माणूस. तो चेक-इनच्या जवळ पोहोचला असतानाच ती धावत तिथं गेली आणि त्याच्या चेहऱ्यावर तिनं एक द्रव्य ओतलं.

“हे तू काय करत आहेस?” मोडक्यातोडक्या इंग्रजीत तो बोलला.

“सॉरी,” इतकंच बोलून ती तिथून पळून गेली.

आयस्याहचं म्हणणं आहे की हा एका टीव्ही शोसाठी करण्यात आलेला प्रँक होता. पण मलेशियन अधिकाऱ्यांनी तिच्यावर खुनाचा आरोप लावलेला आहे.

अटक झाल्यानंतर सीती आयस्याह

अटक झाल्यानंतर सीती आयस्याह

या सगळ्यापासून काही मीटरच्या अंतरावर एका कॅफेमध्ये उत्तर कोरियाचे तथाकथित एजंट बसले होते. आपली मोहीम फत्ते झाल्याचं पाहून समाधानी होत, डिपार्चर गेटकडे जात दुबईचं विमान पकडताना ते CCTV मध्ये दिसले.

त्या गलेलठ्ठ माणसाला आता अस्वस्थ वाटू लागलं होतं. चेहऱ्याला खाज सुटली होती आणि श्वास घेणं कठीण जात होतं. काही मिनिटांतच तो एका खुर्चीवर बेशुद्ध होत कोसळला. विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांनी अॅम्ब्युलन्स बोलावली. ती क्वालालंपूरच्या दिशेनं वेगानं जात असतानाच त्याच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरलं आणि तो मरण पावला.
तो उत्तर कोरियाचा मुत्सद्दी अधिकारी किम चुल असल्याचं त्याच्या पासपोर्टवर म्हटलं होतं. पण मरण पावलेला हा माणूस प्रत्यक्षात होता किम जाँग-नाम, किम जाँग-उनचा मोठा सावत्र भाऊ.

किम जाँग-नामवर VX या तीव्र नर्व्ह एजंटचा विषप्रयोग करण्यात आला होता. या द्रव्याचा अगदी वाळूच्या कणाइतका थेंबही श्वासाद्वारे गेल्यास मृत्यू अटळ असतो.

किमची हत्या निगरगट्टपणे करण्यात आली होती. आपला यामध्ये हात असल्याचं उत्तर कोरियाने कितीही फेटाळलं असलं, तरी सगळे पुरावे त्याच्या प्याँगयांगमधल्या लहान सावत्र भावाच्या दिशेनेच बोट दाखवत होते. पण यामागचा उद्देश काय असावा?

त्यांचे वडील किम जाँग-इल यांचे गुंतागुंतीचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या दोन अधिकृत बायका होत्या. शिवाय त्यांचे इतर तीन महिलांसोबत विवाहबाह्य संबंध होते, आणि यातूनच पाच मुलं होती.
किम जाँग-नाम हा त्यांच्या पहिल्या प्रेयसी साँग हेय-रिम यांचा मुलगा. किम जाँग-उन हा को याँग-हुई या दुसऱ्या प्रेयसीचा धाकटा मुलगा. या वृद्ध हुकुमशहाने त्याच्या प्रेयसी आणि त्यांच्या मुलांना गुप्त ठेवलं होतं. ते एकमेकांपासून दूर, स्वतंत्र बंगल्यांमध्ये रहायचे. म्हणून त्यांचे वडील एकच असले तरी, किम जाँग-नाम आणि किम जाँग-उन कधीही भेटले नाहीत.

मोठा मुलगा असल्याने किम जाँग-नामला बराच काळ किम जाँग-इल यांचा संभाव्य वारसदार मानलं जात होतं. पण 2001 मध्ये बनावट पासपोर्टच्या मदतीने जपानमध्ये शिरत असताना त्याला अटक करण्यात आली होती. त्याला टोकियोमधल्या डिस्नेलँडला भेट द्यायची होती.

उत्तर कोरियाच्या या भावी राजाला पकडून विमानाकडे नेत असतानाचं आणि त्याची रवानगी करतानाचं चित्रण करण्यात आलं. प्याँगयांगमध्ये त्याचे वडील हा अपमान कधीच विसरू शकले नाहीत. त्यामुळे वारसा हक्कातून किम जाँग-नामला बेदखल करण्यात आलं आणि त्याला चीनमध्ये अज्ञातवासात पाठवण्यात आलं. किंबहुना तसं सांगण्यात आलं.

पण ही गोष्ट इथेच थांबत नाही.

किम जाँग-नामवर VX या तीव्र नर्व्ह एजंटचा विषप्रयोग करण्यात आला होता. या द्रव्याचा अगदी वाळूच्या कणाइतका थेंबही श्वासाद्वारे गेल्यास मृत्यू अटळ असतो.
किमची हत्या निगरगट्टपणे करण्यात आली होती. आपला यामध्ये हात असल्याचं उत्तर कोरियाने कितीही फेटाळलं असलं, तरी सगळे पुरावे त्याच्या प्याँगयांगमधल्या लहान सावत्र भावाच्या दिशेनेच बोट दाखवत होते. पण यामागचा उद्देश काय असावा?
त्यांचे वडील किम जाँग-इल यांचे गुंतागुंतीचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या दोन अधिकृत बायका होत्या. शिवाय त्यांचे इतर तीन महिलांसोबत विवाहबाह्य संबंध होते, आणि यातूनच पाच मुलं होती.
किम जाँग-नाम हा त्यांच्या पहिल्या प्रेयसी साँग हेय-रिम यांचा मुलगा. किम जाँग-उन हा को याँग-हुई या दुसऱ्या प्रेयसीचा धाकटा मुलगा. या वृद्ध हुकुमशहाने त्याच्या प्रेयसी आणि त्यांच्या मुलांना गुप्त ठेवलं होतं. ते एकमेकांपासून दूर, स्वतंत्र बंगल्यांमध्ये रहायचे. म्हणून त्यांचे वडील एकच असले तरी, किम जाँग-नाम आणि किम जाँग-उन कधीही भेटले नाहीत.

उत्तर कोरियाच्या या भावी राजाला पकडून विमानाकडे नेत असतानाचं आणि त्याची रवानगी करतानाचं चित्रण करण्यात आलं. प्याँगयांगमध्ये त्याचे वडील हा अपमान कधीच विसरू शकले नाहीत. त्यामुळे वारसा हक्कातून किम जाँग-नामला बेदखल करण्यात आलं आणि त्याला चीनमध्ये अज्ञातवासात पाठवण्यात आलं. किंबहुना तसं सांगण्यात आलं.
पण ही गोष्ट इथेच थांबत नाही.

योजी गोमी या जपानी पत्रकाराला किम जाँग-नामला बाहेरच्या इतर कोणाही व्यक्तीपेक्षा जवळून ओळखण्याची संधी मिळाली. बीजिंग आणि मकाऊमध्ये अनेकदा झालेल्या भेटींमध्ये गोमीला किम जाँग-नामच्या आयुष्याविषयी जाणून घेता आलं.

गोमीच्या म्हणण्यानुसार, किम जाँग-नाम आणि त्याच्या वडिलांचे संबंध 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात ते स्वित्झर्लंडमधल्या बोर्डिंग स्कूलमधून शिकून परतल्यापासूनच बिघडू लागले होते. युरोपात 9 वर्षं राहण्याचा परिणाम त्यांच्यात दिसून येत होता.
1990च्या दशकामध्ये उत्तर कोरियात मोठा दुष्काळ पडला. याला ‘ऑर्ड्युअस मार्च’ म्हणजे अत्यंत जिकिरीचा कालावधी, असंही म्हटलं जातं. सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर खालावलेला आर्थिक पाठिंबा आणि एकामागोमाग एक आलेल्या विध्वंसक पुरांमुळे देशात अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण झाली.
चार वर्षांच्या कालावधीत जवळपास 10 ते 30 लाख लोकांचा कुपोषण आणि आजारांमुळे मृत्यू झाला.

गोमीच्या म्हणण्यानुसार, वडिलांनीउत्तर कोरियाची आर्थिक व्यवस्था बदलावी असं किम जाँग-नामला वाटत होतं. चीनसारखे बदल घडवावे, काही प्रमाणात खासगी मालमत्तेसाठी परवानगी द्यावी, बाजारव्यवस्थेत बदल व्हावे,असं किम जाँग-नाम यांना वाटत होतं.

“किमजाँग-इल त्याच्यावर खूपचिडले,” गोमी म्हणतो. “आपलेविचार बदल नाहीतरप्याँगयांगमधून चालता हो, असं त्यांनी किम जाँग-नामला सांगितलं.”

पत्रकार ब्रॅडली के. मार्टिन याला दुजोरा देतात. त्यांनी किम राजघराण्याचं सर्वांत चांगलं चरित्र लिहिलेलं आहे. या जाडजूड पुस्तकाचं नाव आहे 'Under the Loving Care of the Fatherly Leader'.

“डिस्नेलँडला गेला म्हणून किम जाँग-नामला नाकारण्यात आलं नाही. अख्खं कुटुंबच वेगळ्या नावांनिशी प्रवास करतं. त्याच्या वडिलांना लाज वाटली, असं मला वाटत नाही. किम जाँग-नाम हा धोरणांविषयी आणि काही धोरणात्मक गोष्टी बदलण्याविषयी बोलला आणि त्याच्या वडिलांना ते आवडलं नाही,” ते सांगतात.

किम जाँग-नामला हद्दपार करून बीजिंगला पाठवण्यात आलं.

किम जाँग-उनच्या वडिलांनी त्याची निवड केली कारण त्याच्या सर्व मुलांपैकी तोच सर्वांत जास्त स्वार्थी आणि धोकादायक होता.”

पत्रकार ब्रॅडली के. मार्टिन

त्यानंतरचा वारसदार असायला हवा होता किम जाँग-इलचा मधला मुलगा, किम जाँग-चोल. पण त्याचा कधी गांभीर्याने विचारच करण्यात आला नाही, असं दिसतं. त्याऐवजी त्यांनी त्याच्या सगळ्यांत धाकट्या मुलाची, किम जाँग-उनची निवड केली.

मार्टिन यांच्या म्हणण्यानुसार, “किम जाँग-उनच्या वडिलांनी त्याची निवड केली कारण त्याच्या सर्व मुलांपैकी तोच सर्वांत जास्त स्वार्थी आणि धोकादायक होता.”

दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर, वारसाहक्कासाठीची क्रूर लढाई जिंकून कुटुंबाचं अस्तित्व टिकवण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्याच्याकडे होत्या.

आणि त्यानी नक्कीच त्याचा निर्दयीपणा दाखवून दिलेला आहे. गोमी यांच्या म्हणण्यानुसार, किम जाँग-इल यांच्या मृत्यूनंतर किम जाँग-उन यांनी सूत्रं हाती घेतल्याबरोबर त्यांचा सावत्र भाऊ घाबरला.

“किमजाँग-इल यांच्या मृत्यूनंतर किम जाँग-नामला अचानक असुरक्षित वाटू लागलं. जानेवारी 2012 मध्ये आम्ही शेवटचं बोललो, त्यावेळी किम जाँग-नाम मला म्हणाला, ‘माझा भाऊ आणि किम घराणं माझ्यासोबत काही तरी भयंकर करतील’.”

किम जाँग-उन यांनीच त्यांच्या भावाचा खून घडवून आणला, असं मार्टिन यांना वाटतं. असं का, याविषयी त्यांचं स्वतःचं काही तर्क आहे.

“त्याचे काका चांग साँग-थाएक यांच्या खुनानंतर हे सगळं जुळून येतं. उठावाची आखणी केल्याचा चांग यांच्यावर आरोप होता. पण आम्ही (पाश्चिमात्य माध्यमांनी) त्याकडे दुर्लक्ष केलं. मग किम जाँग-उनने त्याच्या भावाला लक्ष्य केलं. आमच्याकडे अशा काही बातम्या आल्या आहेत, ज्यानुसार चांग चीनला गेले आणि म्हणाले, ‘आपण किम जाँग-उनचा काटा काढू आणि किम जाँग-नामला गादीवर बसवू.’ किमनं विचार केला, ‘माझा काका आणि माझा दादा माझ्या विरोधात कट करत आहेत, यामध्ये त्यांना चिनी लोकांची साथ आहे.’ ही सगळी गोष्ट सुसंगत वाटणारी आहे.”

हा सगळा सिद्धांत असला तरी त्यांचा पुढचा निष्कर्ष फेटाळून लावण्याजोगा वाटत नाही.

“आता त्याच्या राजवटीला कुणाचाही धोका नाही. त्याला घराण्यातूनच विरोध करणारे संपले आहेत.”

आज किम जाँग-उनच उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा आहेत. पण आता त्यांना त्यांच्या गरिबीत अडकून पडलेल्या देशाकडून काय हवंय?

पुढचा प्रवास

उत्तर कोरियाचे संस्थापक अध्यक्ष किम इल-सुंग यांचा ब्राँझचा पुतळा.

1998च्या उन्हाळ्या दरम्यान किम जाँग-उन स्वित्झर्लंडच्या शाळेतून उत्तर कोरियात सुटीसाठी आले होते. वॉनसन शहरातल्या समुद्रकिनारी असलेल्या आणि कुटुंबाच्या उन्हाळी सुटीसाठी तयार करण्यात आलेल्या घरात ते राहिले होते.

आता ते ट्रेननं राजधानीत, प्याँगयांगला परतत होते. त्याच्यासोबत बसून बाहेरची गावं आणि भातशेतीकडे पहात होते जपानी शेफ - केन्जी फुजीमोटो.

2003च्यापुस्तकात फुजिमोटो लिहितात की किम जाँग-उन यांनीत्यांना सांगितलं होतं,“फुजिमोटो, आमचा देश अजूनही औद्योगिक तंत्रज्ञानात इतर आशियाई देशांच्या तुलनेत मागे आहे. आमच्याकडे अजूनही वीज जाते.”

नंतर किम यांनी उत्तर कोरियाची तुलना चीनच्या परिस्थितीशी केल्याचं ते सांगतात.

“मीअसं ऐकलंयकी चीन विविध पातळ्यांवर यशस्वी झालेला आहे. आमची लोकसंख्या आहे 2.3 कोटी. चीनमध्ये एक अब्जापेक्षा जास्त लोकसंख्या आहे. मग ते एवढ्या लोकांना वीज कशी काय पुरवतात? एक अब्ज लोकांसाठी पुरेशा अन्नाचं उत्पादन करणं कठीण असलं पाहिजे. त्यांचं उदाहरण आपणआचरणात आणायला हवं.”

फुजिमोटो यांचं म्हणणं खरं असेल तर लहान किम जाँग-उन तेव्हा राजवटीचा अनादर करणाऱ्या गोष्टी बोलत होते.

1955 पासून उत्तर कोरिया ‘ज्युचे’ (Juche) विचारसरणीचं पालन करत आला आहे. या शब्दाचं अनेकदा “आत्मनिर्भरता” असं भाषांतर केलं जातं. मार्क्सवादी - लेनिनवादी विचारसरणीला किम इल-संगने दिलेली ही “मोठी देणगी” मानली जाते.
प्याँगयांगमध्ये डेयडाँग नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर ज्युचे प्रित्यर्थ एक मोठं स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि याची खिल्ली उडवणं महाग पडू शकतं.

पण ज्युचे एक थोतांड आहे. उत्तर कोरिया हा देश आत्मनिर्भर नाही आणि तो कधीच नव्हता. पहिली 40 वर्षं हा देश आर्थिक सहाय्यासाठी जवळपास पूर्णपणे मॉस्कोवर अवलंबून होता. सोव्हिएत युनियनचं विघटन झाल्यानंतर उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था कोसळली आणि लोकांची उपासमार झाली.
दुष्काळ सुरू असतानाच उत्तर कोरियाच्या लोकांनी व्यापाराला सुरुवात केली. या सगळ्या संकटांतून आणि 1990च्यादशकातल्या घसरणीतून नवीन अर्थव्यवस्था जन्माला आली. यावर कोणाचंही नियंत्रण नाही आणि कोणतीही अधिकृत मान्यता नसली तरी ही अर्थव्यवस्था उत्तर कोरियाच्या लोकांना कशीबशी जिवंत ठेवते.

दक्षिण कोरियाच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष पार्क गेऊन-हेय यांनी काएसाँग औद्योगिक क्षेत्र बंद करण्याचे आदेश नुकतेच दिले होते. हा भाग उत्तर कोरियाच्या DMZ लालागूनच आहे.

“मी ही बातमी ऐकल्याबरोबर माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांना चीनमध्ये जाऊन ‘चॉकोपाय’ विकत घ्यायला सांगितलं,” असं देश सोडून पळालेल्या त्या तरुणानं मला सांगितलं.

हे ऐकून मी बुचकळ्यात पडलो.

“सॉरी, पण तुझे वडील कुठे आहेत?” मी विचारलं.

“उत्तर कोरियामध्ये,” तो म्हणाला.

“मगतू त्यांना फोन कसा करतोस?” मी विचारलं.

त्याच्या वडिलांकडे मोबाईल फोन आणि एका चिनी कंपनीचं सिम कार्ड होतं. हे बेकायदेशीर आणि धोकादायक असलं तरी सगळीकडे पाहायला मिळतं.
आठवड्यातून एकदा त्याचे वडील चीनच्या सीमेकडे जातात, तिथल्या मोबाईल नेटवर्कला कनेक्ट होतात आणि मग त्यांच्या मुलाला त्यांना फोन करता येतो.

“आणि ते चॉको पाईजचं काय?” मी विचारलं.

काएसाँग औद्योगिक परिसरात असणाऱ्या अनेक दक्षिण कोरियन कंपन्या त्यांच्या उत्तर कोरियन कामगारांना पगाराच्या काही हिश्श्यामध्ये दक्षिण कोरियन उत्पादनं देत होत्या. चॉको पाईज या उत्पादनांपैकी सर्वांत लोकप्रिय होतं.

काएसाँग औद्योगिक परिसरामध्ये असणाऱ्या अनेक दक्षिण कोरियन कंपन्या त्यांच्या उत्तर कोरियन कामगारांना पगाराच्या काही हिश्श्यामध्ये दक्षिण कोरियन उत्पादनं देत होत्या. चॉको पाईज या उत्पादनांपैकी सर्वांत लोकप्रिय होतं.

ही चॉको पाईज इतके लोकप्रिय होते की उत्तर कोरियाच्या काळ्या बाजारात याचा चलनासारखा वापर होत होता. आता काएसाँग औद्योगिक परिसर बंद होणार असल्यानं चॉको पाईजची काळ्या बाजारातली किंमत गगनाला भिडणार होती. म्हणूनच मग त्यानं त्याच्या वडिलांना चीनमध्ये जाऊन त्यांना शक्य असतील तितके बॉक्सेस आणायला सांगितलं. यातून त्यांना चांगलाच नफा झाला असता.

सोलच्या बाहेर असणाऱ्या एका चर्चमध्ये मला उत्तर कोरियातून पळून आलेला एक वेगळाच माणूस भेटला. त्याची उंची कमी, खांदे रुंद आणि बाहू पिळदार होत्या. त्याच्या तोंडातले काही दात गायब होते, आणि त्याच्या बोलण्यातला वेगळाच हेल समजणं माझ्या दक्षिण कोरियन दुभाष्यालाही कठीण जात होतं.

“मी स्मगलर होतो,” तो म्हणाला.

त्याने सांगितलं की तो उत्तर कोरियाच्या सीमेवरच्या जवानांना लाच द्यायचा, जेणेकरून ते रात्रीच्या वेळी सीमेलगतच्या काही भागावर पहारा न देता, तो भाग तस्करीसाठी मोकळा सोडायचे. त्याची गँग मग त्या भागातून स्क्रॅप मेटल आणि मौल्यवान खनिजं घेऊन हद्द आलांडून चीनमध्ये शिरायची.

“परत येताना तुम्ही कोणत्या वस्तू लपवून आणायचे?” मी त्याला विचारलं.

“खायच्या वस्तू, कपडे, DVDs, ड्रग्स, पॉर्न साहित्य, असं बरंच काही. ड्रग्स आणि पॉर्न साहित्य नेणं सर्वांत धोकादायक असायचं,” तो म्हणाला.

“उत्तर कोरियातून तू चोरून नेलेली सगळ्यांत धोकादायक वस्तू कोणती होती?” मी विचारलं.

“जर तुम्ही किमच्या पुतळ्याचा पत्रा काढून नेला, तर तुमच्या हाती घबाड लागू शकतं,” तो म्हणाला.

चीनमधून आयात करण्यात आलेल्या आणि स्मगल करून, चोरून आणण्यात आलेल्या वस्तूंची विक्री मोठ्या बाजारांमध्ये होते. प्रत्येक गावा-शहरांत असे बाजार उदयाला आलेले आहेत.

अशी अनौपचारिक अर्थव्यवस्था सध्या कार्यरत आहे. धनाढ्य उद्योजकांचा एक नवीन वर्ग उदयाला आलेला आहे, जो प्याँगयांगमध्ये पर्टी विकत घेत असल्याची माहिती मिळत आहे.
उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था वाढतेय, पण विचारसरणीमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही. कोणत्याही प्रकारचे मूलभूत बदल घडण्याचे संकेत नेतृत्वाकडून देण्यात आलेले नाहीत.

त्यानंतर यावर्षी 20 एप्रिलला वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये किम जाँग-उन यांनी भाषण दिलं, ज्याचा मथळा होता :

“सध्या घडत असलेल्या राज्यक्रांतीच्या नव्या आणि सर्वोच्च टप्प्याला गती देण्यासाठी आवश्यक असे समाजवादी बदल.”

सर्व प्रकारची आण्विक शस्त्रं आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या थांबवत असल्याचं या भाषणामध्ये किम यांनी जाहीर केलं. आणि सोबतच उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी नवीन धोरणांची घोषणा केली. हे भाषण म्हणजे किम जाँग-उन यांनी लहान असताना त्या ट्रेनमध्ये दिलेल्या वचनाची - चीनचा कित्ता गिरवण्याची तयारी असल्याचा संकेत असल्याचं काही अभ्यासकांना वाटतं.

असं वाटणाऱ्यांपैकी एक आहेत सोल मधल्या योनसेई विद्यापीठाचे जॉन डेल्युरी.

“नव्या धोरणांमध्ये अर्थव्यवस्थेला प्राधान्य आहे. 100 टक्के लक्ष अर्थव्यवस्थेवर आहे,” ते म्हणतात. “किम जणू म्हणतोय, ‘मी खरंच अर्थव्यवस्था सुधारणार आहे. आता पुन्हा कोणाचीही उपासमार होणार नाही'."

“गेल्या पाच-सहा वर्षांत थोडी सुधारणा झाली, पण फार मोठं काही घडलं नाही. अर्थव्यवस्थेऐवजी त्याचं लक्ष आण्विक कार्यक्रमाकडे होतं, म्हणूनच आता मोठा बदल करण्यात येतोय.”

पण ब्रॅडली के. मार्टिनसारख्या इतरांचा मात्र यावर फारसा विश्वास नाही.

“त्याला खरंच असं वाटतं, की तो देशात बदल घडवून आणू शकेल? मला माहित नाही. त्याच्याबद्दल जी काही माहिती उपलब्ध आहे, त्यासोबत हे सुसंगत वाटत नाही. त्याला खरंच असं करायचं असतं तर त्याच्याकडे यासाठी बरीच वर्षं होती. पण त्यानं ‘चला स्मारकं बांधूया’ असं म्हणत त्याच्या वडीलांसारखा आणि आजोबांसारखाच फक्त देखावा केला. त्या दोघांनीही फक्त एवढंच केलं होतं.”

“अर्थव्यवस्था दलली आहे, असं दाखवणारे कोणतेही पुरावे मला आढळलेले नाहीत. त्यांनी फक्त कोणताही थेट उल्लेख न करता, दुसरी एक अर्थव्यवस्था असल्याचं मान्य केलं. आणि तसं करणं त्यांना भाग होतं. कारण जर ती ‘दुसरी अर्थव्यवस्था’ अस्तित्व नसती, तर सगळे लोक मेले असते.”

आता जर किम जाँग-उन यांना देशाचा विकास घडवायचाच असेल तर त्यांना अनेक बंधनं उठवावी लागतील. देशाला व्यापार आणि मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. आणि ते मिळवून देण्यासाठी अमेरिका आणि अमेरिकेची इतर मित्रराष्ट्र त्याचा “हुकुमी एक्का” म्हणजेच आण्विक अस्त्रांचा त्याग करण्याची मागणी करणार, हे नक्की आहे. नेमकं हेच करण्याचा त्याचा उद्देश आहे का?

सोलच्या बाहेर असणाऱ्या एका चर्चमध्ये मला उत्तर कोरियातून पळून आलेला एक वेगळाच माणूस भेटला. त्याची उंची कमी, खांदे रुंद आणि बाहू पिळदार होत्या. त्याच्या तोंडातले काही दात गायब होते, आणि त्याच्या बोलण्यातला वेगळाच हेल समजणं माझ्या दक्षिण कोरियन दुभाष्यालाही कठीण जात होतं.
“मी स्मगलर होतो,” तो म्हणाला.
उत्तर कोरियाच्या सीमेवरच्या जवानांना लाच द्यायचा, जेणेकरून ते रात्रीच्या वेळी सीमेलगतच्या काही भागावर पहारा न देता, तो भाग तस्करीसाठी मोकळा सोडायचे. त्याची गँग मग त्या भागातून स्क्रॅप मेटल आणि मौल्यवान खनिजं घेऊन हद्द आलांडून चीनमध्ये शिरायची.
"परत येताना तुम्ही कोणत्या वस्तू लपवून आणायचे?” मी त्याला विचारलं.

“खायच्या वस्तू, कपडे, DVDs, ड्रग्स, पॉर्न साहित्य, असं बरंच काही. ड्रग्स आणि पॉर्न साहित्य नेणं सर्वांत धोकादायक असायचं,” तो म्हणाला.
उत्तर कोरियातून तू चोरून नेलेली सगळ्यांत धोकादायक वस्तू कोणती होती?” मी विचारलं.
जर तुम्ही किमच्या पुतळ्याचा पत्रा काढून नेला, तर तुमच्या हाती घबाड लागू शकतं,” तो म्हणाला.
चीनमधून आयात करण्यात आलेल्या आणि स्मगल करून, चोरून आणण्यात आलेल्या वस्तूंची विक्री मोठ्या बाजारांमध्ये होते. प्रत्येक गावा-शहरांत असे बाजार उदयाला आलेले आहेत.
अनौपचारिक अर्थव्यवस्था सध्या कार्यरत आहे. धनाढ्य उद्योजकांचा एक नवीन वर्ग उदयाला आलेला आहे, जो प्याँगयांगमध्ये पर्टी विकत घेत असल्याची माहिती मिळत आहे.
उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था वाढतेय, पण विचारसरणीमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही. कोणत्याही प्रकारचे मूलभूत बदल घडण्याचे संकेत नेतृत्वाकडून देण्यात आलेले नाहीत.

त्यानंतर यावर्षी 20 एप्रिलला वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये किम जाँग-उन यांनी भाषण दिलं, ज्याचा मथळा होता :

"घडत असलेल्या राज्यक्रांतीच्या नव्या आणि सर्वोच्च टप्प्याला गती देण्यासाठी आवश्यक असे समाजवादी बदल.”
सर्व प्रकारची आण्विक शस्त्रं आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या थांबवत असल्याचं या भाषणामध्ये किम यांनी जाहीर केलं. आणि सोबतच उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी नवीन धोरणांची घोषणा केली. हे भाषण म्हणजे किम जाँग-उन यांनी लहान असताना त्या ट्रेनमध्ये दिलेल्या वचनाची - चीनचा कित्ता गिरवण्याची तयारी असल्याचा संकेत असल्याचं काही अभ्यासकांना वाटतं.
एक आहेत सोल मधल्या योनसेई विद्यापीठाचे जॉन डेल्युरी.
“नव्या धोरणांमध्ये अर्थव्यवस्थेला प्राधान्य आहे. 100 टक्के लक्ष अर्थव्यवस्थेवर आहे,” ते म्हणतात. “किम जणू म्हणतोय, ‘मी खरंच अर्थव्यवस्था सुधारणार आहे. आता पुन्हा कोणाचीही उपासमार होणार नाही'."
“गेल्या पाच-सहा वर्षांत थोडी सुधारणा झाली, पण फार मोठं काही घडलं नाही. अर्थव्यवस्थेऐवजी त्याचं लक्ष आण्विक कार्यक्रमाकडे होतं, म्हणूनच आता मोठा बदल करण्यात येतोय.”
पण ब्रॅडली के. मार्टिनसारख्या इतरांचा मात्र यावर फारसा विश्वास नाही.
“त्याला खरंच असं वाटतं, की तो देशात बदल घडवून आणू शकेल? मला माहित नाही. त्याच्याबद्दल जी काही माहिती उपलब्ध आहे, त्यासोबत हे सुसंगत वाटत नाही. त्याला खरंच असं करायचं असतं तर त्याच्याकडे यासाठी बरीच वर्षं होती. पण त्यानं ‘चला स्मारकं बांधूया’ असं म्हणत त्याच्या वडीलांसारखा आणि आजोबांसारखाच फक्त देखावा केला. त्या दोघांनीही फक्त एवढंच केलं होतं.”

“अर्थव्यवस्था दलली आहे, असं दाखवणारे कोणतेही पुरावे मला आढळलेले नाहीत. त्यांनी फक्त कोणताही थेट उल्लेख न करता, दुसरी एक अर्थव्यवस्था असल्याचं मान्य केलं. आणि तसं करणं त्यांना भाग होतं. कारण जर ती ‘दुसरी अर्थव्यवस्था’ अस्तित्व नसती, तर सगळे लोक मेले असते.”
आता जर किम जाँग-उन यांना देशाचा विकास घडवायचाच असेल तर त्यांना अनेक बंधनं उठवावी लागतील. देशाला व्यापार आणि मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. आणि ते मिळवून देण्यासाठी अमेरिका आणि अमेरिकेची इतर मित्रराष्ट्र त्याचा “हुकुमी एक्का” म्हणजेच आण्विक अस्त्रांचा त्याग करण्याची मागणी करणार, हे नक्की आहे. नेमकं हेच करण्याचा त्याचा उद्देश आहे का?

चेन-स्मोकिंग रॉकेट मॅन

4 जुलै 2017च्या पहाटे नॉर्थ कोरियाच्या आकाशात उंचावर असणाऱ्या अमेरिकेच्या टेहळणी उपग्रहानं उत्तर प्याँगयँग प्रांतामध्ये काही हालचाल नोंदवली. तब्बल 16 चाकं असणारं “Transporter Erector Launcher” (TEL) वाहन एअरफिल्डमधून विमानांच्या उड्डाणांसाठी असलेल्या जागेमधून जात होतं. त्यावर होतं एक मोठं क्षेपणास्त्र.

पुढचा तासभर अमेरिकन गुप्तचर खात्यातले अधिकारी ते क्षेपणास्त्र उभं केलं जात असताना आणि डागण्यासाठी इंधन भरून सज्ज केलं जात असताना त्यावर नजर ठेवून होते. हे सगळं घडत असताना त्यांना एक माणूस या क्षेपणास्त्राच्या आजूबाजूला सिगरेट ओढत फिरताना स्पष्ट दिसत होता.

डिप्लोमॅट मासिकाचे संपादक अंकित पांडा यांनी सांगितलेला हा वृत्तांत आहे. गुप्तचर खात्यातल्या एका सोर्सने आपल्याला ही माहिती दिल्याचं ते म्हणतात. ज्वालाग्राही इंधनाने भरलेल्या क्षेपणास्त्राच्या इतक्या जवळ सिगरेट ओढत फिरणारा एकच माणूस असू शकतो - किम जाँग-उन.

तांबडं फुटल्याच्या काही वेळानंतर क्षेपणास्त्राचं मुख्य इंजिन सुरू करण्यात आलं आणि त्यानं आकाशाकडे झेप घेतली. अवकाशात 3,000 किमीची झेप घेऊन मग ते जपानजवळच्या समुद्रात कोसळलं.

किम जाँग-उन यांचा आनंद गगनात मावेना. या घटनेनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटोंमध्ये ते वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना अलिंगन देताना दिसतात. आणि त्यांच्या हातात आहे, सर्व काही स्पष्ट करणारी तीच सिगरेट.

खंड ओलांडून जाऊ शकणारं हे नवं बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं असल्याचा दावा प्याँगयांगने केला. अमेरिकेवरही हल्ला करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता होती. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही 4 जुलैची, अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाची भेट होती.

उत्तर कोरियाने ठामपणे आपला आण्विक कार्यक्रम राबवला होता. हे करताना त्यांच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं होतंच, शिवाय हा आण्विक कार्यक्रम थांबवावा, यासाठी त्यांच्यावर मोठा आंतरराष्ट्रीय दबावही टाकण्यात आला होता.

2011मध्ये सत्तेत आल्यानंतर किम जाँग-उन यांनी उत्तर कोरियाच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र विषयक योजनांना मोठी गती दिली, आणि त्यांच्या वडिलांपेक्षा बऱ्याच कमी कालावधीमध्ये अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घडवून आणल्या.

या सगळ्याचा कळस झाला गेल्या वर्षी 29 नोव्हेंबरला. Hwasong 15 या नव्या अजस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. या नव्या क्षेपणास्त्रामध्ये संपूर्ण अमेरिका बेचिराख करू शकेल, इतकी “प्रचंड मोठी आणि विध्वंसक” स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता असल्याचं उत्तर कोरियाची राष्ट्रीय वृत्तसंस्था KCNA ने म्हटलं.

किम जाँग-उन यांनी, “क्षेपणास्त्रांची फौज उभारण्यामागचं मुख्य कारण असणारा, देशाच्या आण्विक कार्यक्रमाचं ऐतिहासिक ध्येय पूर्ण झाल्याचं अत्यंत अभिमानाने जाहीर केल्याचं” KCNAने त्यांच्या वृत्तात म्हटलं होतं.

उत्तर कोरियाबाहेरच्या अनेक तज्ज्ञांचा याला दुजोरा होता. आता किम अमेरिकेवर हल्ला करू शकत होते.

ही घोषणा आणि किम जाँग-उन यांचा 2018चा नवीन वर्षाचा संदेश यामध्ये फक्त महिनाभराचा कालावधी होता. नवीन वर्षाच्या संदेशात त्यांनी दक्षिण कोरियात होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिकसाठी पथक पाठवण्याची तयारी दाखवली होती.

या संदेशाद्वारे किम यांनी जगासोबत संवाद साधण्याची तयारी दाखवल्याचं बाहेरच्या जगातल्या अनेकांना वाटलं.

पण काही महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. ते म्हणजे, अमेरिकेवरही हल्ला करू शकण्याजोगी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र विकसित करण्यावर किम यांचा एवढा भर का होता? ही एवढी आण्विक अस्त्र सज्जता कशासाठी?

किम यांना दक्षिण कोरियासोबत “शांतपणे” रहायचं आहे, आणि त्यासाठी आण्विक कार्यक्रम थांबवण्याची त्यांची तयारी आहे, या सगळ्यावर तुमचा कितपत विश्वास आहे, हे या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशी देता यावरून लक्षात येईल.

राष्ट्राध्यक्ष मून यांच्यासोबत नुकत्याच पार पडलेल्या परिषदेमध्ये किम जाँग-उन यांनी “संपूर्ण कोरियन द्विपकल्प अण्वस्त्र मुक्त” करण्याचं आवाहन केलं. आणि स्वतः करत असलेल्या अणुचाचण्या आणि त्यासाठीच्या प्रयोगशाळा बंद करत असल्याचं जाहीर केलं.
पण याचा अर्थ किम जाँग-उन सरसकट अण्वस्त्र त्याग करतील, असा होत नाही. खरी परिस्थिती वेगळीचं असल्याचं मत Korean Peninsula Future Forum मधल्या आण्विक अस्त्रांच्या तज्ज्ञ ड्युयोन किम व्यक्त करतात.

“उत्तर कोरिया ही एक आण्विक सत्ता असल्याचं त्यानं प्रत्यक्षात जाहीर केलं होतं.” त्या म्हणतात. “आण्विक दृष्ट्या प्रगत देश स्वतःबद्दल असंच म्हणतात. तब्बल 6 अणुचाचण्या केल्यानंतर आता त्यांना अधिक चाचण्या करण्याची गरजच नाही. म्हणूनच मग आता किम जाँग-उन आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. आता शिखर परिषदांमध्ये सहभागी होत आपण देखील कोणत्याही इतर देशाप्रमाणेच ताकदवान देशाचे नेते असल्याचं ते भासवत आहेत. अमेरिकेच्या तुल्यबळ असल्याचं आता ते दाखवतात.”

उत्तर कोरियाकडे असलेली अण्वस्त्र ही बचावासाठी असल्याचं अनेक जण मानतात. किम घराण्यानं सद्दाम हुसैन, त्यानंतर कर्नल गद्दाफीचं पतन पाहिलं. आणि अमेरिकेनं पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या ‘राजवट बदलण्याच्या’ मोहिमेला अण्वस्त्र हाच एक उपाय असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.

पण किम जाँग-उन किंवा त्याच्या वडिलांना स्वतःच्या बचावासाठी ICBMची (आंतरखंड बॅलिस्टिक मिसाईल) गरज कधीच नव्हती, असं विरोधकांचं म्हणणं आहे.
बुसानमधल्या डाँगसिओ विद्यापीठाचे प्राध्यापक ब्रायन मेयर्स यांचं हेच मत आहे. रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये नुकत्याच दिलेल्या भाषणात ते म्हणतात, “या राजवटीला आपण अण्वस्त्र मिळवण्यापासून थांबवू शकलो नाही. यातच दिसून येतं की त्यांच्या सुरक्षेसाठी हे तितकंसं गरजेचं नव्हतं. अण्वस्त्रांशिवाय उत्तर कोरिया जर लिबियाइतकाच कमकुवत असता, तर उशिरात उशिरा 1998पर्यंत त्यांच्यावर बॉम्बहल्ला नक्की झाला असता.”

असं न होण्याचं कारण म्हणजे दक्षिण कोरियाची प्रतिहल्ला करण्यासाठीची दुर्बलता. त्यांची राजधानी सोल ही DMZ पासून फक्त 50 किमीवर आहे, म्हणजेच अगदी उत्तर कोरियाच्या तोफांच्या हल्ल्याच्या टप्प्यात.

मार्शलचा अपमान

मग जर उत्तर कोरियाची आण्विक क्षेपणास्त्र ही बचावासाठी गरजेची नसल्याचं मान्य केलंच, तर मग ती नक्की कशासाठी आहेत?
ड्युयोन किंग यांच्यामते होऊ घातलेली आघाडी मोडण्यासाठी हे सगळं आहे. "प्याँगयांगने उत्तर आणि दक्षिण कोरियाला भविष्यात एकत्र करायचं ठरवलं, तर अमेरिकेनं दक्षिण कोरियाच्या मदतीसाठी येऊ नये, यासाठी हा सगळा खटाटोप आहे."

“उत्तरकोरियाचे जाहीरनामे, त्यांच्या कृती आणि त्यांचं खासगीतलं बोलणं हे सगळं पाहता ही अण्वस्त्रं धमकावण्यासाठी आणि भविष्यामध्ये कोरियाचं बळजबरीने एकीकरण करण्यासाठी, अशा दोन्ही कारणांसाठी आहेत. याबाबत ते उघडपणेही बोललेले आहेत आणि खासगीतही.”

किम यांची अण्वस्त्रंही एकीकरणासाठी आहेत, हे मेयर्स यांनाही मान्य आहे, पण हे एकीकरण बळजबरीनेच करण्यात येईल, असं त्यांना वाटत नाही.

“अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता असणं उत्तर कोरियासाठी गरजेचं आहे. यामुळे त्यांना दोन्ही देशांवर शांती करारावर सह्या करण्यासाठी दबाव टाकता येईल. ही अण्वस्त्र केवळ याच दबावासाठी आहेत.”

“वॉशिंगटनबरोबर करार करताना अमेरिकेला कोरियन द्वीपसमूहातून आपलं सैन्य माघारी घ्यावं लागेल. याची पुढची पायरी म्हणजे, उत्तर आणि दक्षिण कोरियाला एकत्र येत कोणत्यातरी प्रकारचा एक संघ तयार करावा लागेल. 1960पासून आतापर्यंत अनेकदा प्याँगयांगनं हे बोलून दाखवलं आहे. याच्यापुढे काय होईल याचा अंदाज लावणं सहज शक्य आहे.”

मागास, गरीब उत्तर कोरिया त्यांच्यापेक्षा जास्त आधुनिक, श्रीमंत आणि लष्करीदृष्ट्या प्रगत दक्षिण कोरियावर एकीकरण लादू शकेल, ही कल्पना हास्यास्पद वाटू शकते. कदाचित ती तशी आहे देखील. पण हे कितीही अशक्यप्राय असलं तरी प्याँगयांगचं हेच ध्येय असल्याचं ब्रॅडली के. मार्टिन म्हणतात.

“पुन्हा एकत्र येणं हे त्यांचं सगळ्यांत मोठं उद्दिष्ट असल्याचं माझं पूर्वीपासूनच मत आहे,” ते म्हणतात. “असं करणं आपल्याला शक्य नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी हा विचार खूप पूर्वीच सोडून दिल्याचं खूप लोकं म्हणतात. पण साऱ्या जगाचं लक्ष आपल्याकडे असणं हे किती आत्मविश्वास देणारं असतं हे, ते विसरत आहेत. हे उत्तर कोरियाला कमी लेखण्यासारखं असेल. जर तुम्ही एका माणसाच्या हुकूमशाही अमलाखाली एखाद्या गोष्टीचा प्रचार करत असाल तर तुम्ही लोकांना ‘आपण काहीही गोष्ट करू शकतो’ असा विश्वास देऊ शकता.”

मी आतापर्यंत बीजिंगच्या अर्ध्या रस्त्यावर पोहोचायला हवं होतं. पण त्याऐवजी मी प्याँगयांगमधल्या एका हॉटेलच्या कळकट्ट खोलीत बसलेलो आहे. लांबवरच्या एका भिंतीवर लावलेली किम इल-संग आणि किम जाँग-इलची पोर्ट्रेट्स माझ्याकडे रोखून बघतायत. आताच्या घडीला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्रूर वाटत आहेत.

मी घाबरून गेलोय, धक्क्यात आहे. टेबलच्या दुसऱ्या बाजूला एक दुबळा माणूस बसलाय. त्याच्या चेहऱ्यावर वर्षानुवर्षं सिगरेट ओढल्याच्या खुणा आहेत. खुनशी पण थंड नजरेने तो माझ्याकडे पहातोय.

“हे सगळं लवकर संपवून तू लवकर घरी जाऊ शकतोस,” उजव्या हाता मधली न पेटवलेली सिगरेट खेळवत तो म्हणतो. “जर तू तुझा गुन्हा मान्य करून माफी मागितलीस तर हे सगळं संपेल. पण जर का तू इन्कार केलास, तर मात्र गोष्टी आणखीन वाईट होतील.”

तासाभरापूर्वी मी प्याँगयांग विमानतळावर बीजिंगसाठीचं विमान पकडायच्या तयारीने गेलो होतो. आता कदाचित मला काही तास, किंवा कदाचित काही दिवस तपासणीला सामोरं जावं लागेल.

चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या माझ्या तपासनीसाच्या मतानुसार माझा गुन्हा होता, “मार्शल किम जाँग-उनचा अपमान” करणं. माझ्या पोटात भीतीने खड्डा पडलाय.

हा गंभीर गुन्हा आहे. माझ्या हातून हे नेमकं कसं घडलं याबद्दल माझी खात्री नाही. कदाचित माझी चौकशी करणाऱ्यालाही हे नेमकं माहीत नाही. पण त्याने काहीच फरक पडत नाही. माझा दोष काय आहे, ते आधीच दुसरीकडे ठरवण्यात आलेलं आहे. आता त्याला फक्त माझ्याकडून कबुलीजबाब काढून घ्यायचाय.

लेखर रूपर्ट विंगफिल्ड-हेयज प्याँगयांगमध्ये ताब्यात

लेखर रूपर्ट विंगफिल्ड-हेयज प्याँगयांगमध्ये ताब्यात

रात्र जशी पुढे सरकतेय, तशी माझी चौकशी करणारी टीम बदलते, आणि धमक्या अधिक घाबरवणाऱ्या, गंभीर होत जातात. माझी चौकशी करण्यासाठी आलेला नवीन माणूस माझ्याकडे थंड, खुनशी नजरेनं पाहतोय.

“केनेथ बे प्रकरणाची चौकशी मीच केली होती,” तो म्हणाला. “याचा अर्थ काय हे तुला कळलंच असेल.”

मला उमगलं होतंच. केनेथ बे हे कोरियन वंशांचे अमेरिकन पाद्री होते ज्यांना उत्तर कोरियानं 15 वर्षं सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली होती. त्यांच्या सुटेकसाठीचा करार होण्यापूर्वी त्यांनी तुरुंगामध्ये 735 दिवस शिक्षा भोगली होती.

“किमचं अस्तित्व एखाद्या राजासारखं आहे. त्याच्यावर टीका करण्याची किंवा त्याला विरोध करण्याची कोणालाही मुभा नाही. त्याला विरोध करणाऱ्या किंवा आव्हान देणाऱ्या व्यक्तीला किंवा देशाला न चुकता प्रतिहल्ला सहन करावा लागतो.”

माझी चौकशी घाबरवणारी होती, पण त्यासोबतच अवास्तवही होती. प्याँगयांगला तीन नोबेल विजेते भेट देणार होते आणि त्याच्या वार्तांकनासाठी मला पाचारण करण्यात आलं होतं. मग मला अटक करण्यात आली आणि तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली, कारण मी जे काही लिहिलं ते राजवटीला पसंत पडलं नाही.

माझ्यासाठी ही गोष्ट अगदीच नवीन होती. पण मला देण्यात आलेलं काम मूलभूतरीत्या समजण्यात मी कमी पडलो होतो. कोणतीही टीका न करता मला उत्तर कोरियाचं सत्य जगासमोर मांडायचं होतं. मी मार्ग चुकलो होतो आणि आता मला शत्रू ठरवण्यात आलं होतं.

परागंदा झालेल्या एका व्यक्तीनं काही आठवड्यांनंतर मला सोलमध्ये समजावून सांगितलं.

“किम जाँग-उनवर टीका करणं, इतकाच तुझा गुन्हा नव्हता, पण तू ती टीका कुठे राहून केलीस, हे महत्त्वाचं होतं. त्याच्या स्वतःच्या राजधानीतच तू त्याच्यावर टीका केलीस,” तो म्हणाला.

माझी अटक आणि त्यानंतरची सुटका याला परवानगी देणारा एकच माणूस होता आणि तो म्हणजे किम जाँग-उन याबाबत त्याची खात्री आहे.

“तू नशीबवान होतास, म्हणून सुटलास,” तो म्हणाला.

प्रोफेसर पॅक हाक-सून हे दक्षिण कोरियातल्या सेजाँग इन्स्टिट्यूटमध्ये Centre for North Korean Studies चे संचालक आहेत. त्यांचंही असं म्हणणं आहे की मी नशीबवान असल्यानंच केवळ “हकालपट्टी”वर माझी सुटका झाली.

“किमचं अस्ति एखाद्या राजासारखं आहे. त्याच्यावर टीका करण्याची किंवा त्याला विरोध करण्याची कोणालाही मुभा नाही. त्याला विरोध करणाऱ्या किंवा आव्हान देणाऱ्या व्यक्तीला किंवा देशाला न चुकता प्रतिहल्ला सहन करावा लागतो,” ते म्हणतात.

लहानसहान गुन्ह्यांसाठी परदेशी नागरिकांना अटक करून अडकवून ठेवण्याचा उत्तर कोरियाचा इतिहास आहे. किम जाँग-उनची ही खासियत आहे. 2011पासून 12 परदेशी नागरिक आणि 4 दक्षिण कोरियन नागरिकांना प्याँगयांगमध्ये अडकवून ठेवण्यात आलेलं आहे.

2016 मध्ये मला अटक होण्याच्या तीन महिने आधी ओट्टो वॉर्मबिअर या तरुण अमेरिकन पर्यटकाला 15 वर्षं सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. हॉटेलच्या भिंतीवरचं प्रचार पत्रक चोरल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्याचा कथित गुन्हा पाहता, त्याला देण्यात आलेली शिक्षा भयंकर होती.

अमेरिकन पर्यटक ओट्टो वॉर्मबिअर

अमेरिकन पर्यटक ओट्टो वॉर्मबिअर

कालांतराने वॉर्मबिअरला अमेरिकेत परत पाठवण्यात आलं, पण तोपर्यंत त्याच्या मेंदूला गंभीर इजा झालेली होती, आणि काही दिवसांतच त्याने प्राण सोडला. त्याची केस नेहमीपेक्षा वेगळी असल्याचं बहुतेक निरीक्षकांना वाटतं. अमेरिकन बंदीवानांचा सहसा शारीरिक छळ केला जात नाही, कारण ते खूप मौल्यवान असतात.

प्याँगयांगसाठी अमेरिकन बंदीवान हे धोरणात्मक खेळातले प्यादे असतात. त्यांच्यामुळे अमेरिकन सरकारला दीर्घ वाटाघाटींमध्ये सहभागी व्हावं लागतं आणि तुरुंगातल्या त्या माणसाची सुटका करण्यासाठी उच्चपदस्थ व्यक्तीला पाठवावं लागतं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनाही हे करावं लागलं होतं. 2009 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन हे बंदीवान करण्यात आलेल्या दोन पत्रकारांना परत आणण्यासाठी प्याँगयांगला गेले होते.
आता निवृत्त असणारे डेव्हिड स्ट्रॉब हे त्यावेळी बिल क्लिंटन यांच्यासोबत असणाऱ्या मुत्सद्द्यांपैकी एक होते.
“बिल क्लिंटन यांनी यावं अशी मागणी उत्तर कोरियाने केली. फक्त याच मार्गाने ते पत्रकारांना अमेरिकेकडे परत सोपवणार होते. उत्तर कोरियाला किम जाँग-इल आणि बिल क्लिंटन यांचा एकत्र फोटो यायला हवा होता, हे स्पष्ट आहे. त्यांना हा फोटो त्यांच्या जनतेला दाखवता आला असता, आणि आपल्या इच्छेसमोर अमेरिकेला झुकायला लावल्याबद्दल गर्व करता आला असता,” त्यांनी सांगितलं.
पण प्रत्यक्षात किम जाँग-उन यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नको आहेत. त्यांना खरीखुरी गोष्ट अपेक्षित आहे. अमेरिकेच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षासोबत समोरासमोर वाटाघाटी करणं.
9 मे रोजी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ प्याँगयांगमध्ये दाखल झाले. महिन्याभराच्या कालावधीतली ही त्यांची दुसरी भेट होती. त्यांनी किम जाँग-उन यांची भेट घेतल्यावर उत्तर कोरियाच्या कोठडीत असणाऱ्या तीन अमेरिकन बंदीवानांचं हस्तांतरण करण्यात आलं.
किम डाँग-चुल या 65 वर्षांच्या कोरियन वंशाच्या अमेरिकन व्यक्तीला सर्वांत जास्त काळ बंदीवान ठेवण्यात आलं होतं. ते उत्तर कोरियाच्या कोठडीत 952 दिवस होते.
किम जाँग-उन यांच्यासोबत बैठकीत सहभागी होण्यासाठी या तिघांची मुक्तता करण्याची अट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी घातली होती.
अॅण्ड्रूज एअर बेसवर मुक्त करण्यात आलेल्या या तीन बंदिवानांची भेट घेतल्यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केलं, “किम जाँग-उन यांचे आम्ही आभारी आहोत, ज्यांनी या तीन बंदिवानांना चांगली वागणूक दिली.”
उत्तर कोरियाच्या या नेत्यासोबतच्या पहिल्या वहिल्या परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रंप किती आतूर आहेत, हे यावरून दिसलं.

प्याँगयांगसाठी अमेरिकन बंदीवान हे धोरणात्मक खेळातले प्यादे असतात. त्यांच्यामुळे अमेरिकन सरकारला दीर्घ वाटाघाटींमध्ये सहभागी व्हावं लागतं आणि तुरुंगातल्या त्या माणसाची सुटका करण्यासाठी उच्चपदस्थ व्यक्तीला पाठवावं लागतं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनाही हे करावं लागलं होतं. 2009 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन हे बंदीवान करण्यात आलेल्या दोन पत्रकारांना परत आणण्यासाठी प्याँगयांगला गेले होते.
आता निवृत्त असणारे डेव्हिड स्ट्रॉब हे त्यावेळी बिल क्लिंटन यांच्यासोबत असणाऱ्या मुत्सद्द्यांपैकी एक होते.
“बिल क्लिंटन यांनी यावं अशी मागणी उत्तर कोरियाने केली. फक्त याच मार्गाने ते पत्रकारांना अमेरिकेकडे परत सोपवणार होते. उत्तर कोरियाला किम जाँग-इल आणि बिल क्लिंटन यांचा एकत्र फोटो यायला हवा होता, हे स्पष्ट आहे. त्यांना हा फोटो त्यांच्या जनतेला दाखवता आला असता, आणि आपल्या इच्छेसमोर अमेरिकेला झुकायला लावल्याबद्दल गर्व करता आला असता,” त्यांनी सांगितलं.
पण प्रत्यक्षात किम जाँग-उन यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नको आहेत. त्यांना खरीखुरी गोष्ट अपेक्षित आहे. अमेरिकेच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षासोबत समोरासमोर वाटाघाटी करणं.

9 मे रोजी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ प्याँगयांगमध्ये दाखल झाले. महिन्याभराच्या कालावधीतली ही त्यांची दुसरी भेट होती. त्यांनी किम जाँग-उन यांची भेट घेतल्यावर उत्तर कोरियाच्या कोठडीत असणाऱ्या तीन अमेरिकन बंदीवानांचं हस्तांतरण करण्यात आलं.
किम डाँग-चुल या 65 वर्षांच्या कोरियन वंशाच्या अमेरिकन व्यक्तीला सर्वांत जास्त काळ बंदीवान ठेवण्यात आलं होतं. ते उत्तर कोरियाच्या कोठडीत 952 दिवस होते.
किम जाँग-उन यांच्यासोबत बैठकीत सहभागी होण्यासाठी या तिघांची मुक्तता करण्याची अट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी घातली होती.
अॅण्ड्रूज एअर बेसवर मुक्त करण्यात आलेल्या या तीन बंदिवानांची भेट घेतल्यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केलं, “किम जाँग-उन यांचे आम्ही आभारी आहोत, ज्यांनी या तीन बंदिवानांना चांगली वागणूक दिली.”
उत्तर कोरियाच्या या नेत्यासोबतच्या पहिल्या वहिल्या परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रंप किती आतूर आहेत, हे यावरून दिसलं.

लेखक : रूपर्टविंगफिल्ड-हेयज
ऑनलाईन निर्मिती : बेन मिलने
ग्राफिक्स: जॉय रॉक्सस
फोटो : EPA; गेटी इमेजेस; रॉयटर्स
एडिटर : फिनलो रॉहरर
Built with Shorthand
All images subject to copyright