डेन्मार्क

 1. क्रिश्चियन एरिक्सन

  डेन्मार्कचा आक्रमक मिडफिल्डर म्हणून ओळखला जाणारा ख्रिस्टियन एरिक्सन डेन्मार्क आणि फिनलँड यांच्यातील सामन्यादरम्यान मैदानात बेशुद्ध झाला होता.

  अधिक वाचा
  next
 2. Video content

  Video caption: कोरोना लॉकडाऊन शिथील केल्यानंतरही 'या' देशाचे लोक पाळतात सोशल डिस्टन्सिंग

  एकही मृत्यू होण्यापूर्वीच डेन्मार्कने देशात निर्बंध लादले आणि आता ते शिथीलही केले जातायत.

 3. लॉकडाऊन शिथील झालं आणि सलूनमध्ये उसळली गर्दी

  लॉकडाऊनमध्ये एक समस्या सर्वांनाच सतावतेय, ती म्हणजे वाढते केस!

  केस कापायला सलूनशिवाय पर्याय नाही आणि घरी हा प्रयोग करून पाहण्याची प्रत्येकाची हिंमत नाही.

  आणि ही परिस्थिती फक्त भारतातच नव्हे तर जिथेजिथे लॉकडाऊन सुरू आहे, तिथे पाहायला मिळते आहे.

  डेन्मार्कमध्येसुद्धा जवळपास महिनाभरानंतर लॉकडाऊन शिथील करण्यात आलं, आणि लोकांनी.डोक्यावरच्या केसांचा भार हलका करण्यासाठी सलूनमध्ये गर्दी केली.

  "आमच्याकडे रीघ लागली आहे. पुढच्या दोन तासांसाठी बुकिंग फुल्ल आहे," असं फिल ओलँडर यांनी सांगितलं. ते फिल्स बार्बर चेनचे प्रमुख आहेत.

  कोरोना

  "पुढच्या तीन आठवड्यांकरता मी बिझी असेन. लय काम आहे. जराही फुरसतीचा वेळ मिळणार नाही," असं एका हेअरड्रेसरने सांगितलं.

  प्रत्येक ग्राहकाचे केस कापल्यानंतर आमची उपकरणं सॅनिटाईझ करायची आहेत. दुकान स्वच्छ करायचं आहे. ऑनलाईन व्यवहार असल्याने कार्ड्स सॅनिटाईझ करायची आहेत. ही अतिरिक्त कामं वाढली आहेत, असं सलून चालवणाऱ्या अनेकांनी सांगितलं.

  तरुण मंडळी सलूनमध्ये येऊन केस कापू लागली आहेत. मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीला धोका लक्षात घेऊन ते बाहेर पडत नाहीयेत.

  वाचा सविस्तर इथे